top of page
Search

शाश्वत शेती साठी जैविक नियंत्रण

Updated: Apr 7, 2020

*शाश्वत शेती साठी जैविक नियंत्रण*

द्राक्ष शेती किंवा कोणतीही शेती म्हंटली की प्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे पाऊस, चिखल आणि त्यात होणाऱ्या असंख्य फवारण्या. मग ते कीटकनाशक असेल, बुरशी नाशक असेल किव्हा अन्य फवारण्या असतील. बऱ्याच लोकांना या फवारण्या म्हणजेच उत्कृष्ठ शेती वाटते. खरं तर आपण विचार करायला हवा की एक 15 ते 20 वर्षा पूर्वी आपण खरच इतक्या मोठ्या प्रमाणात फवारणी करत होतो का ? तर उत्तर मिळेल की नाही, नक्कीच नाही.मग असे काय बदल होतायेत आपल्या शेतीत की आम्ही इतके बदलतो आहे.

जरा विचार केला तर लक्षात येईल की, इमिडाक्लोप्रिड अगोदर आपण 50 मिली वापरात होतो आणि आज आपण 150 मिली वापरतो आहे, तसेच थायमिठओक्साम 50 वरून 100 झाले, acitamiprid 60 वरून 125 झाले, लेम्बडा सायलॉथ्रीन 200 वरून 300 मिली झाले

बरेच कीटकनाशक असे पण आहेत की त्यांचे परिणाम आता दिसत नाही यात इंडोक्साकार्प सारखे बरेच कीटकनाशक येतात.

असेच आपण अनेक स्ट्रॉबिलिन बुरशीनाशकांची पण अवस्था पहिली आहे की ते आज कोणताही रोग नियंत्रणात आणू शकत नाही.

किडींचा विचार केला तर मावा , तुडतुडे, थ्रीप्स , पांढरी माशी, कोबीवरील हिरवी आळी आज आपली डोकेदुखी ठरत आहे.

कपाशी मधील अती प्रगत असे BT तंत्रज्ञान आज गुलाबी बोन्ड आळी ने उध्वस्त केले आहे,

डाळिंबातील तेल्या असो की द्राक्षातील केवडा रोग असो आज बागांच्या बागा उध्वस्त करत आहेत

शेतात जेव्हा आपण स्प्रे घेऊन जातो तेव्हा हीच किडी आणि रोग आपल्याकडे पाहून हसत आहे असे वाटते, ते सुद्धा म्हणत असतील की मारा कितीही औषधे तुम्ही आम्ही पण तयार आहोत.

मित्रानो किडी आणि रोग जेव्हा औषधाने नियंत्रित होत नाही तेव्हा त्या अवस्थेला म्हणतात "रेजिस्टन्स" म्हणजेच प्रतिकार क्षमता.

प्रतिकार क्षमता ही सर्व सजीवांची एक नैसर्गिक क्षमता आहे, जी सर्व सजीवांना मिळालेली एक देणगीच आहे. आता आपण एक साधे सोपे उदाहरण पाहू या...

जर समजा आपल्यापैकी 4 जण जर काश्मीर ला फिरायला गेले तर दोघांना लगेच तिथल्या थंड हवेने सर्दी होते, ऐकाला तर ताप पण येतो, पण एक जण असतो ज्याला काहीच होत नाही, आता ज्याला काहीच होत नाही तो म्हणजे "रेसिस्टंट" त्याच्या मध्ये सर्दी विरुद्ध प्रतिकारशक्ती असते आणि त्याला सर्दी होत नाही, ही त्याची नैसर्गिक क्षमता असते की जी त्याच्यामध्ये मुळातच असते.

अशीच प्रतिकार क्षमता किडी व रोग निर्माण करणारे कवक यांच्यातही असते आणि ती हळू हळू वाढत जाते ज्याला आपण रेसिस्टंट असे म्हणतो.

जेव्हा आपण शेतातील 100 किडीवर औषद फवारतो तेव्हा त्यातील अंदाजे 96 किडी मरतात आणि " *4* " अश्या किडी असतात की ज्या मरत नाही. पुढे जेव्हा या 4 किडींपासून नवीन पिढी येते तेव्हा त्यातील 50 किडी रेसिस्टंट असतात व 50 किडी औषधाने मारून जातात, परत जेव्हा या 50 किडींची पुढची पिढी येते तेव्हा 75 किडी या रेसिस्टंट असतात व फक्त 25 किडी मरतात. आणि एक वेळ अशी येते की 100 च्या 100 किडी या रेसिस्टंट होतात आणि औषधाने एक पण किडी मारत नाही.याला म्हणतात रेसिस्टंट तयार होणे.

आता कितीही चांगले आणि उच्च प्रतीचे औषध आपण निर्माण केले तरी एक वेळ अशी येणार की जेव्हा प्रत्येक औषधाविरुद्ध किडीमध्ये प्रतिकारशक्ती ही निर्माण होणारच. आणि आपल्याला प्रत्येक वेळी परत एका नवीन औषधाची गरज पडणार.

असे होऊ नये असे जर आपणास वाटत असेल तर आपण 96 किडीं पेक्षा त्या 4 किडींवर लक्ष दिले पाहिजे की ज्या 4 किडींमुळे भविष्यात हा प्रश्न उपस्थित होणार आहे.

आपल्याकडे असा पर्याय हवे की जे या 4 किडींचा नायनाट करू शकले पाहिजे.

यासाठी आपल्या कडे एकाच पर्याय असू शकतो आणि तो म्हणजे बायो कंट्रोल म्हणजेच जैविक नियंत्रण. जैविक नियंत्रण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक गोष्टी चा वापर करून कीड व रोग यांचे नियंत्रण करणे.

जैविक agent हे किडी व कवक यांच्या मध्ये वेगवेगळ्या अवस्थेत रोग निर्मिती करतात व त्यांचा नाश करतात.

अश्या प्रकारे ज्या किडी रासायनिक औषधाने नियंत्रित होत नाही त्या सुद्धा या प्रकारे आपण नियंत्रित करू शकतो आणि सोबतच आपण रेसिस्टंट नियंत्रण करू शकतो.

*वापर कसा करावा*

जैविक नियंत्रण करताना आपण यांचा वापर हा खालील प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.

1) शेणखता मध्ये मिक्स करणे

२) जमिनीवर dusting करणे

3) प्रत्येक कीटकनाशकांच्या स्प्रे आपण यांचा वापर करू शकतो.

*किडींच्या नियंत्रण करण्याकरिता वापरले जाणारे जैविक घटक*

१) बिव्हेरिया बसियाना

2) मेंटरायसीम ऐणीसोपली

*कवक नियंत्रणासाठी*

१) ट्रायकोडर्मा व्हीरिडी

२) सिडीमोनास

३) ब्यासीलस सबतीलस

4) अँपलिओमयसिस

*निम्याठोडं नियंत्रण*

१) पॅसिलोमयसिस लिलियांसी

अश्या प्रकारे जैविक घटकांचा वापर करून किडी व रोग व्यवस्थापन केल्यास आपण नक्कीच शासवत शेती करू शकतो आणि निसर्गाचे संगोपन ही करू शकतो.

..........राहुल वडघुले

९८८११३५१४०

(ट्रॉपिकल ऍग्रोसिस्टम - डेव्हेलोपमेंट मॅनेजर

एम.एस. सी. - कीटक शास्त्र -नाशिक)

 
 
 

コメント


Back To Home
Waiting Room

Corporate Office

Tropical Agrosystem (I) Pvt.Ltd.

Office No. 309/310

Mahalakshmi Market, Market Yard,

Krushi  Utpana Bazar Samite

Gultekadi, Pune - 411034 

Customer Care For Maharashtra

Rahul Vadghule : 9881135140

Copyright by Rahul Vadghule
  • YouTube

Find us on 

bottom of page